mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai : महानगरपालिकेचा जुहूतील सुभोभिकरणाला बॉलिवुड कनेक्ट

बॉलिवुड कलाकारांवर आधारीत संकल्पनांचा समावेश होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम उपनगरामध्ये पर्यटकांच्या मोठ्या हजेरीची ठिकाणे असलेल्या जुहू परिसरात पालिकेकडून सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. या सुशोभिकरणाच्या कामाअंतर्गत जुहू परिसरातील बॉलिवुडकरांवर आधारीत संकल्पना विकसित करण्यात येत आहे.या कामांचा भाग म्हणून जुहू परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे.

यमुना नगरच्या एअरपोर्टच्या परिसरात हा सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. स्थानिक परिसरातील रहिवासी तसेच पर्यटकांना याठिकाणी सेल्फी घेण्याचे ठिकाण म्हणून हा परिसर विकसित करण्यात येतो आहे. याठिकाणी एकुण सात प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वॉल ग्राफिटी, ओपन एअर थिएटर तसेच फुटपाथ आणि रेलिंगची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.

सध्याच्या आय लव्ह मुंबई या लोगोच्या जवळच या सेल्फी पॉईंटची जागा निश्चित करण्यात आली आहे. सेल्फी पॉईंट तसेच फुटपाथ आणि रेलिंगच्या कामासाठी एकुण ४ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुशोभिकरणामध्ये बॉलिवुड थीमचा वापर करण्यात आला आहे.

एकुण सात कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ओपन थिएटर, झाडांच्या जवळ आसन व्यवस्था, वास्तु आणि शिल्पांची उभारणी, चालण्यासाठीचे पेव्हमेंट, बसण्यासाठीचे उद्यान आणि बॉलिवुडवर आधारीत थीमचे ग्राफिटीही भींतींवर करण्यात येणार आहेत.

जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या बॉलिवुड सेलिब्रिटींच्या घरांमुळेच बॉलिवुडची थीम याठिकाणी वापरण्यात येणार आहे. जुहू परिसरात या सेलिब्रिटींच्या आकर्षणामुळेच पर्यटकही याठिकाणी येत असतात. त्यामुळेच बॉलिवुड थीमचा वापर सुशोभीकरणाच्या कामामध्ये करण्यात येणार आहे. फुटपाथसाठीही नव्या पद्धतीच्या कॉंक्रिटच्या पेव्हर ब्लॉकचा वापरण्यात करण्यात येणरा आहे. तसेच झाडांच्या कठड्यांनाही गार्ड लावून त्याठिकाणी रोषणाई करण्यात येईल. तसेच ओपन एअर थिएटरलाही आसन व्यवस्थेसाठी नवा लुक देण्यासाठीचा पालिकेचा मानस आहे. पालिकेच्या के पश्चिम विभागाकडून हे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

उद्यानामध्ये झाडांच्या खाली बसण्यासाठी आरामदायी आणि प्रशस्त असे कठडे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे झाडाच्या सावलीत बसण्याचा अनुभव पर्यटकांना याठिकाणी घेणे शक्य होणार आहे. बॉलिवुडमधील प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित असे वास्तु आणि शिल्पही याठिकाणी ठेवण्यात येतील. तर उद्यानाच्या भीतींवर ग्राफिटी्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकारांकडून वॉल आर्ट पेटिंग करण्यात येईल. हे पेंटिंग बॉलिवुड या संकल्पनेवर आधारीत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT