Mumbai Municipal Corporation office sakal
मुंबई

Mumbai : म्हणून मुंबई महानगरपालिका कार्यालयाचा ताबा घेता येणार नाही ; उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या विधीमंडळात सध्या आमदार हे अस्तित्वात आहेत. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानंतर विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय हे शिंदे गटाकडून ताब्यात घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेचे चिन्ह आणि नाव याबाबतच्या निकालानंतर महाराष्ट्र विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा आज शिंदे गटाकडून घेण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयाच्या ताब्याबाबत विचारले असता,

उद्धव ठाकरे यांनी या विषयावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याचवेळी शिंदेंना पक्षासाठी ठाकरे नाव वगळून पक्ष वाढवण्याचेही आव्हान दिले आहे. मुंबईत शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सगळ्या घडामोडींवर भाष्य केले.

महाराष्ट्राच्या विधीमंडळात सध्या आमदार हे अस्तित्वात आहेत. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानंतर विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय हे शिंदे गटाकडून ताब्यात घेण्यात आले. परंतु पालिकेच्या पक्ष कार्यालयाच्या बाबतीत विचारले असता,

त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. सध्या पालिकेत नगरसेवक अस्तित्वात नाहीत. त्यामुळे नगरसेवकांच्या गैरहजेरीत कार्यालय सुरू राहणे अपेक्षित नाही.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या गैरहजेरीत या कार्यालयावर दावा सांगणे उचित नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

कोणत्या आधारावर दावा सांगणार ? नगरसेवक नाहीत म्हणूनच प्रशासकांनी कार्यालय सील केले असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर छावणीचे स्वरूप

आज विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाने मिळवले, पण मुंबई महानगरपालिकेतील कार्यालय राखण्यासाठी शिवसेनेच्या माजी कार्यकर्त्यांची धावपळ होताना दिसली. पक्ष कार्यालयाबाहेर माजी नगरसेवकांनी आज ठिय्या आंदोलनही केले.

पालिकेतील कार्यालय शिंदे गटाकडून ताब्यात घेण्याची कुणकुण लागल्याने माजी नगरसेवकांनी पालिका कार्यालयात धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका मुख्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर पोलीस छावणीचे रूप आले होते. आम्हालाही संख्येपणे कार्यालय द्यावे ही प्रमुख मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे.

त्यांनी समजून घेतल तर आम्हीही समजून घेऊ, अन्यथा आम्हीही राडा करू असा पवित्रा माजी नगरसेविका विशाखा राऊत यांनी घेतला. शिवसेनेचे एकुण ८५ नगरसेवक याआधी सत्तेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT