Body Building sakal
मुंबई

Mumbai News : पालिकेतील सुरक्षा रक्षकाने पटकावले शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक

छत्रपती संभाजीनगर येथे २६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'भारत श्री २०२३' ही राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्‍पर्धा पार पडली. या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात साटम यांनी रौप्यपदक पटकावले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्‍या केईएम रुग्णालयातील सुरक्षा रक्षक अमीत साटम यांनी छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्‍याच झालेल्या 'भारत श्री' राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ८० किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. या उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

पालिकेत कार्यरत असणा-या अधिकारी-कर्मचा-यांच्‍या विविध कलागुणांना संधी देण्‍यासाठी महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविण्‍यात येतात. त्‍यात अभिनय-नृत्‍यापासून विविध क्रीडा प्रकारांसह शरीरसौष्ठव आदींचा देखील समावेश आहे.

महानगरपालिकेत रुजू झाल्‍यानंतर सुरक्षा विभागातील अधिका-यांच्‍या प्रोत्‍साहनामुळे त्‍यांना अधिक प्रेरणा मिळाली. विविध स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होत त्‍यांनी पारितोषिके पटकाली आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे २६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'भारत श्री २०२३' ही राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्‍पर्धा पार पडली. या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात साटम यांनी रौप्यपदक पटकावले.

या यशाबद्दल अतिरिक्‍त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त मिलीन सावंत, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त किशोर गांधी यांच्‍या हस्‍ते व प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी कैलास सुपे आदींच्‍या उपस्थितीत साटम यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT