mumbai nashik highway accident mns demand to build flyover road safety  esakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत नाशिक महामार्गावरील खडवली फाटा बनला मृत्युचा सापळा...

उड्डाणपूल बनविण्याची मनसेची मागणी..

सकाळ वृत्तसेवा

खडवली : मध्य रेल्वेचे स्थानक असलेल्या खडवली येथे मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी येतात. भिवंडी तालुक्याच्या गावांतील नागरिकांना मुंबई नाशिक महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग ०३) ओळांडून आन्हे गावा शेजारील खडवली फाट्यामार्गे प्रवास करावा लागतो.

ह्या महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालत असल्याने खडवलीच्या दिशेने येण्यासाठी जीव मुठीत धरून महामार्ग ओळांडावा लागतो. आता पर्यंत खडवली फाट्यावर शेकडो अपघात झाले असून, हजारो निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.

आज दिनांक १८ जुलै रोजी देखील पहाटे काही विद्यार्थी व प्रवासी काळी पिवळी जीप या वाहनातून खडवली रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी महामार्ग ओळांडताना जीप व कंटेनरची धडक होऊन अपघातात मृत्युमुखी पडले.

ह्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आठवड्यातून सरासरी एक ते दोन अपघात होत असतानाही अजुन इथे उड्डाणपूल उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल उभारण्यासाठी अजुन किती निष्पाप नागरिकांचे बळी हवे आहेत असा संतप्त सवाल मनसेच्या दिनेश बेलकरे यांनी केला आहे,

तसेच युद्ध पातळीवर काम सुरू करून लवकरात लवकर हा उड्डाणपूल उभारण्यात यावा ह्या मागणीसाठी मनवीसेचे पदाधिकारी लक्ष्मण भगत पत्राद्वारे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT