National Science day Sakal
मुंबई

Student Honor : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा गौरव होणार

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षाची संकल्पना ही ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग अशी आहे.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षाची संकल्पना ही ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग अशी आहे.

मुंबई - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षाची संकल्पना ही ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग अशी आहे. मानवी कल्याणासाठी जागतिक पातळीवर संशोधन आणि नाविण्यपूर्ण संकल्पना विकसित करण्याच्या अभ्यासक्रमाला चालना देणारी यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे. त्यामध्ये वैज्ञानिक, संशोधक आणि धोरण निर्माण करणाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करणे हा उद्देश असणार आहे. त्यासोबतच पर्यावरणीय बदल, शाश्वत विकास, जागतिक आरोग्य यासारख्या आव्हानांच्या निमित्ताने सोल्यूशन निर्माण करणे हेदेखील अभिप्रेत आहे.

यंदाच्या वर्षी लहान मुलांसाठीही संपूर्ण आठवड्याभराच्या प्रदर्शन, व्याख्याने, विज्ञान प्रश्नमंजुषा, घोषवाक्य लिहिण्याची स्पर्धा, कार्यशाळा, पथनाट्ये यासारख्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विज्ञान दिनाच्या निमित्ताने नेहरू विज्ञान केंद्र येथे होणार आहे.

रोजच्या जगण्यातील सोप्या विज्ञानाचा वापर या सगळ्या स्पर्धांची थीम होती. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाकडे अधिकाधिक लोकांनी आकर्षित व्हावे असा या जागरूकतेचा उद्देश होता. सोबतच मुलांना वैज्ञानिकांशी, तज्ज्ञांशी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य लोकांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.

दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नेहरू विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्या भौतिक शास्त्रातील रमण इफेक्ट या थिअरीच्या शोधाच्या २८ फेब्रुवारी १९२८ या वर्षातील शोधाच्या निमित्ताने विज्ञान दिन साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT