Sharad Pawar  esakal
मुंबई

Mumbai NCP Party : मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व माजी नगरसेवक शरद पवारांच्या पाठीशी

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर त्याचा परिणाम मुंबईच्या पक्ष संघटनेवरही पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर त्याचा परिणाम मुंबईच्या पक्ष संघटनेवरही पडला आहे. मात्र 2017 साली निवडून आलेल्या पक्षाचे बहुतेक नगरसेवकांचा कल शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा आहे. मात्र भविष्यात ते सिनिअर पवार गटाकडे थांबतील का, हा खरा प्रश्न आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांकडून पक्षावर दावा केला जात आहे. 2017 च्या पालिका निवडणुकीत पक्षाचे 9 नगरसेवक निवडूण आले होते. त्यापैकी एक नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला तर जोगेश्वरीची एक नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई झाली. त्यामुळे पक्षाकडे एकूण 7 नगरसेवक राहिले.

यापैकी कप्तान मलिक आणि सईदा खान हे दोन नगरसेवक नवाब मलिक कुटुंबातील आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत नवाब मलिक कुंटबाने तटस्थ भूमिका स्विकारली आहे.ल त्यामुळे पक्षाचे सात माजी नगरसेवक आमच्या पाठीशी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा राखी सावंत यांनी केला आहे. तर अजित पवार गटाने नियुक्त केलेलले कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी हे नगरसेवक आमच्यामागे असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेसारखी स्थिती होणार का ?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुंबईतील बहुसंख्य शिवसेना नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे होते.मात्र पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात जाताच, कुंपणावर बसलेल्या अनेक ठाकरे समर्थक नगरसेवकांनी मातोश्रीची साथ सोडणे पसंत केले होते. सध्या राष्ट्र्वादीतही पक्षावर दोन्ही गटांनी दावा ठोकला आहे.

भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे पक्ष आणि निवडणूक चिन्हाचे माप अजित पवार यांच्या पदरात पडले.तर यातील अनेक माजी नगरसेवक ज्युनिअर पवारांच्या गोटात जातील असं चित्र आहे. मात्र मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसचा प्रभाव तसा कायम काही पॉकेटपर्यंत मर्यादित राहिला आहे.त्यातही अजित पवार यांनी कधीच मुंबईतल्या पक्ष संघटनेत कधीही लक्ष घातले नव्हते.

मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेसची पक्ष संघटना आणि नगरसेवक शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.भविष्यातही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या साहेबासोबत राहणार आहे.

- राखी जाधव, कार्याध्यक्ष, मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT