नवीन वाहन घेणाऱ्यांना दिलासा sakal
मुंबई

मुंबई : नवीन वाहन घेणाऱ्यांना दिलासा; हँडलिंग चार्जेस पासून मुक्तता

परिवहन विभागाने राज्यभरातील आरटीओ अधिकाऱ्यांना आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांकरीता शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये अशा सूचना असतानाही. वितरकांकडून वाहन विक्री करताना वितरक हैंडलिंग चार्जेस म्हणून ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसुल केले जात आहे. त्यामुळे परिवहन विभागाने आता राज्यभरातील आरटीओ अधिकाऱ्यांना वितरकांची काटेकोर तपासणीचे आदेश दिले आहे.

वाहन नोंदणीसाठी वितरकांनी प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करुन वितरकाने ग्राहकांकडून शासनाने निश्चित केलेल्या नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणतेही अतिरीक्त शुल्क स्विकारण्यात न आल्याची खातरजमा करुनच वाहनाचा नोंदणी क्रमांक जारी करावा, नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क आकारुनच त्याची वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी, वाहन नोंदणीसाठीचे नोंदणी शुल्क व कर याबाबतची माहिती प्रत्येक वितरकाने शो रुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करावी अशा सूचना परिवहन विभागाने दिले आहे.

शिवाय वितरकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्यास संबंधीत प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन यांचेकडे लेखी, समक्ष, टपालाद्वारे शिवाय ई-मेलद्वारे किंवा http://transportcomplaints.mahaonline.gov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. तसेच आवश्यकता भासल्यास ग्राहक संरक्षण मंचाशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असा फलक शो-रुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करण्याबाबत वितरकांना सूचना दिल्या आहे.

वाहनांचा नोंदणी शुल्क, कर घेण्यासंदर्भात आता विरकांना सूचना दिल्या आहे. तर तशी पाटी सुद्धा दर्शनी भागात लावावी लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शुल्काच्या आकारणीपासून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे.

- भरत कळसकर,आरटीओ, ताडदेव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT