Marine Drive Emmanual Yogini
मुंबई

Mumbai News : समुद्र चौपाट्यांवर २६ जीवरक्षक वाढणार; अतिरिक्त आयुक्तांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - जुहू चौपाटी समुद्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने आता समुद्र किनारी व चौपाट्यांवरील सुरक्षा वाढविली आहे. अतिउत्साही पर्यटकांमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी आता सहा समुद्र चौपाट्यांवर १२० जीवरक्षकांचा वॉच असणार आहे.

सध्या चौपाट्यांवर ९४ जीवरक्षक असून यात २६ जीवरक्षक वाढविले असल्याची अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित जीवरक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटीच्या ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक कार्यरत असतील.

मुंबईला १४५ किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा आहे. कुलाबा येथे सुरू होऊन गोराई आणि तेथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे.

यापैकी गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. चौपाटी व समुद्र किनारी येणारे पर्यटक मुंबई महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि

दोन सत्रात गस्त

सहा चौपाट्यांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित जीवरक्षक आणि दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित जीवरक्षक कार्यरत असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT