मुंबई

बाबा सिद्दिकी यांच्या घरासह सात ठिकाणी छापे

सकाळवृत्तसेवा

'झोपु' गैरव्यवहार प्रकरण; "ईडी'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे
मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (झोपु) कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज कॉंग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घरासह सात ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
बाबा सिद्दिकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वांद्रे येथील "झोपु' योजनेत 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

सिद्दिकी यांच्याबरोबरच बांधकाम व्यावसायिक रफिक मुकबूल कुरेशी यांच्या घरावरही छापा घालण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान कार्यालयांचीही झाडाझडती घेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या कथित गैरव्यवहारप्रकरणी बाबा सिद्दिकी, रफिक मुकबूल कुरेशी, नजमुद्दीन मिठी बोरवाला यांच्यासह तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा (एन्फोर्समेंट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट) दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास ईडी करत आहे. गैरव्यवहार झालेल्या योजनेसंबंधी कागदपत्रे मिळवण्यासाठी छापे घालून शोधमोहीम राबवण्यात आली. या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे "ईडी'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

काय होती तक्रार?
या योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्थानिकाने 2012 मध्ये केली होती. वांद्रे येथील जमात-ए-जमुरिया झोपडपट्टीतील काही रहिवाशांच्या नावाने बनावट शिधापत्रिका बनवून त्या पुराव्याआधारे "झोपु' योजनेत बांधलेल्या सात इमारतींत घर मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार आहे, असा तक्रारदाराचा दावा आहे. 2014 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं 13 हजारांनी, चांदी 12,500 रुपयांनी स्वस्त! 18 कॅरेट सोनं 93 हजारांवर; पाहा ताजे दर

IND vs NZ, 1st Test: देवदत्त पडिक्कलची सेन्चुरी हुकली, पण केएल राहुलसोबतच्या दीडशतकी भागीदारीनं घडवला इतिहास

Marathwada Cold : मराठवाड्यात थंडीचा कडाका, उदगीरचे तापमान १०.७ अंशांवर

Latest Marathi News Live Update : बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या 31 वर्ष महिला कॉन्स्टेबल बेपत्ता

जिमसाठी अन्न परवाना बंधनकारक, एफडीएचे नियम; 'एफएसएसएआय'कडे नोंदणी आवश्यक

SCROLL FOR NEXT