railway 
मुंबई

Mumbai News : 'मरे'वर महिन्याभरात ९४१ चेन पुलिंगच्या घटना; ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मध्य रेल्वेवर गेल्या महिन्याभरात ९४१ चेन पुलिंगचा घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधून ७११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आकाराला आहे. या चेनपुलिंच्या घटनेमुळे अनेक लोकल सेवा आणि मेल- एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात प्रवाशांसाठी अलार्म चेन असते, जे ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा ट्रेन थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून छोट्याश्या कारणासाठी ही चेन पुलिंग करण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागते.

यंदा लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यामुळे रेल्वे प्रवासी वाढली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने शेकडो उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहे. त्यामुळे चेन पुलिंगचा घटनाही वाढल्या आहेत. मे २०२३ या एका महिन्यात मध्य रेल्वेवर ९४१ अलार्म चेन पुलिंगचा घटना घडल्या आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण ७११ प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग सहारा घेऊ नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्थानकारव पोहोचण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT