ED i Sakal
मुंबई

Mumbai news : जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट! 'ईडी'कडून आता ठाकरे...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कथित जंबो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आणि ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने बुधवारी 21 जूनला सूरज चव्हाण यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले.

सुरज चव्हाण सोमवारी दुपारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. ईडी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमू नये यासाठी पोलिसांकडूनही काळजी घेतली गेली. ईडी कार्यालयाबाहेर सकाळपासून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

मध्यस्थी असल्याचा आरोप

कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुरज चव्हाण यांनी मध्यस्थी म्हणून भूमिका साकारली होती, असा ईडीला संशय आहे. तसेच सुरज चव्हाण यांनी कोरोना काळानंतर 10 कोटी रुपयांचे 4 फ्लॅट घेतलेचा संशय आहे. त्याचे कागदपत्रेही ईडीच्या हाती लागले आहेत. त्याच अनुषंगाने सुरज चव्हाण यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं.

या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.

यापूर्वीची कारवाई

कथित जंबो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाईचा बुधवारी 21 जूनला मुंबई शहरात ईडीने तब्बल 15 ठिकाणी छापे टाकले. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या जवळचे असलेले सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते.

लाइफलाइन रुग्णालयाशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.पाटकर यांच्यासह ठाकरे गटाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो-५ प्रकल्पाला अखेर गती! भोईरवाडी-उल्हासनगरसाठी एमएमआरडीएच्या निविदा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

SCROLL FOR NEXT