Mumbai News 
मुंबई

Mumbai News : प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणाला जलद लोकलची धडक! जेवणाचा डबा...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. विविध उद्घोषणा करून प्रवाशांना याबाबत जागृतही केले जाते. तरी देखील अनेकदा रेल्वे प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईचा मालाड रेल्वे स्थानकात देखील अशीच एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. दोन तरुण मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा धुण्यासाठी उभे असताना अचानक आलेल्या जलद लोकलचा धक्का लागून अपघात घडला. या अपघातात एक सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.मयंक अनिल शर्मा (१७ वर्षे) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तो मालाड मालवणी येथील राहणारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून या दिवशी दुपारी साडेतीन वाजता दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून एकत्र जेवले. यानंतर जेवणाचा डब्बा व हात धुण्यासाठी ते प्लॅटफॉर्म वर उभे राहीले.मात्र अचानक चर्चगेटच्या दिशेने बोरिवली कडे जाणारी वातानुकूलित जलद लोकल आली.

मात्र त्या दोघांपैकी एका तरुणाला लोकल आल्याचे समजलेच नाही आणि त्याला जोरदार धडक देऊन लोकल पुढे निघून गेली. जोरदार बसलेल्या धडकेमुळे तो तरुण प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला गेला. लोकल ने दिलेल्या धडकेत त्याच्या कानातून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला.

त्यास पुढील उपचारासाठी शताब्दी हॉस्पिटल कांदिवली येथे घेऊन जाण्यासाठी ऑन ड्युटी स्टेशन मास्तर यांनी पोलीस शिपाई राठोड यांना सूचना केली. हमालच्या व त्याच्या मित्राच्या मदतीने शताब्दी हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT