मुंबई

मुंबईत झोकात धावली वातानुकूलित लोकल!

सकाळवृत्तसेवा

मुंबई -  वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईतील प्रवाशांची वातानुकूलित लोकलची प्रतीक्षा अखेर संपली. नाताळनिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईला वातानुकूलित लोकलची भेट दिली. देशातील पहिली वातानुकूलित लोकल सोमवारी सकाळी 10.30 वाजता बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गावरून निघाली. सुटीचा दिवस असूनही मुंबईतील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक नऊवर सोमवारी सकाळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी, खासदार किरीट सोमय्या, पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, आमदार आशिष शेलार यांनी या लोकलला हिरवा कंदील दाखवला. बोरिवलीहून सुटलेली ही पहिली लोकल मोठ्या दिमाखात अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल या स्थानकांत थांबत चर्चगेटला पोचली. थंडीचे दिवस अन्‌ त्यात सुटीचा दिवस असूनही प्रवाशांनी या लोकलने मोठ्या उत्साहात व हौसेपोटी प्रवास केला.

ही लोकल चालवण्याचा पहिला मान मोटरमन शैलेश गेडाम यांना मिळाला. लोकलचा प्रवासी गार्ड होण्याचा मान जगनाथ पी. यांना मिळाला. लोकलचे स्वयंचलित दरवाजे, मोठमोठ्या खिडक्‍या व फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव
प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन साध्या लोकलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; मात्र या वातानुकूलित लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. "यूटीएस ऍप'मध्ये या लोकलचे वेळापत्रक दिलेले नाही. इंडिकेटरवर लोकल वातानुकूलित असल्याचे दाखवले जात नव्हते. त्याबाबत उद्‌घोषणाही करण्यात आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT