मुंबई

कोरोनाचा कहर ! १ मार्चनंतर मुंबईतील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची आकडेवारी १४२ टक्क्यांनी वाढली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या अहवालानुसार मुंबईतील कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतेय. १ मार्चपासून मुंबईतील कोरोना रुग्णाची आकडेवारीत तब्बल १४२ टक्क्यांनी वाढलेली पाहायला मिळतेय. मात्र दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील पन्नास टक्के बेड्स हे अजूनही रिक्त आहेत. कारण तब्बल सत्तर टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या १ टक्क्यांवर आहे.  

१ मार्च २०२१ रोजी मुंबईतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ६९० इतकी होती. मात्र हीच ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २१ मार्च २०२१ रोजी २३ हजार ४४८ एवढी वाढलेली आहे. मुंबईतील हॉस्पिटल्समधील रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात जानेवारी महिन्यात दिवसाला दहा कोरोना रुग्ण दाखल होत होते. हीच आकडेवारी आता दर दिवशी ३० रुग्णांवर पोहोचली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये ३१ जानेवारीपर्यंत केवळ १२० रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. मात्र २३ मार्चच्या दुपारपर्यंत वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तब्बल ९२० नागरिक कोरोनावर उपचार घेत आहेत. 

गेल्या आठवड्यात वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये ५२० नवीन कोरोना रुग्ण दाखल झालेत. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. मात्र सुदैवाची बाब म्हणजे नवीन येणाऱ्या रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत, असं वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटर प्रमुख डॉक्टर राजेश डेरे यांनी सांगितलंय. 

  • BMC रुग्णालयांमध्ये १२ हजार ६९४ खाटा कोरोना रुग्णांसाठी रिक्त ठेवण्यात आल्या आहेत, यापैकी ५ हजार ९१६ खाटा सध्या रिक्त आहेत 
  • सरकारी रुग्णालयांमध्ये १० हजार १९६ खाटा कोरोना रुग्णांसाठी रिक्त ठेवण्यात आल्या आहेत, यापैकी ५ हजार ५ खाटा सध्या रिक्त आहेत 
  • खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार ४९६ खाटा कोरोना रुग्णांसाठी रिक्त ठेवण्यात आल्या आहेत, यापैकी १ हजार ५८५ खाटा सध्या रिक्त आहेत 

BMC च्या अहवालानुसार नवीन रुग्णांमध्ये ७० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याचं डॉक्टर सम्राट शाह यांनी सांगितलं. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार होण्याचं प्रमाण जरी जास्त असलं तरीही पहिल्या लाटेतील कोरोनाच्या धोक्यापेक्षा आता कोरोना हा तितका गंभीर नसल्याचं आढळून येत आहे. 

मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत नसल्याने रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या पुरेशी उपलब्ध असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. मागीलवर्षी साधारण याच काळात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती आणि अनेक रुग्णांना खाटा मिळत नव्हत्या. 

mumbai news active corona cases in mumbai increased by 142 percent since march 2021 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT India Ban : भारतात चॅटजीपीटी बंद होणार, अमेरिकेच्या टॅरिफ झटक्यानंतर आता AI वापरलाही फटका? ट्रम्प यांच्या चाणक्याची खेळी

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे अन् टी२० संघाची घोषणा; अमरावतीच्या खेळाडूला ७ वर्षांनी संधी

Whatsapp मध्ये होतोय मोठा बदल! येत आहे Youtube सारखं फीचर; काय आहे अन् कसं वापरायचं? पाहा

Mumbai Mahapalika: मुंबईतील भाजपच्या विजयामुळे 'आसाम'ची सभा गाजली, नरेंद्र मोदींचे मोठे विधान!

Panchgrahi Yog 2026: मकर राशीत पंचग्रही राजयोग; 'या' 3 राशींचे जीवन बदलणार, एकदा वाचा नाहीतर संधी हातातून निसटेल!

SCROLL FOR NEXT