मुंबई

एअर इंडियाचा अधिकारी सोने तस्करीत अटकेत 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) गजाआड केले. त्याच्याकडून 44 लाख 10 हजारांचे सोने जप्त करण्यात आले. सहार विमानतळावर मंगळवारी (ता. 14) रात्री एआययूचे अधिकारी गस्तीवर होते. त्या वेळी एअर इंडियाच्या सेवा अभियांत्रिकी विभागाचा वरिष्ठ अधीक्षक जनार्दन गुणाजी कोंडविलकर याची त्यांनी झडती घेतली. त्या वेळी त्याच्याकडे सोन्याचे आठ तुकडे सापडले. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या जगदीश रावल याला हे सोने दिले जाणार होते. दोघांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सोने तस्करीत विमानतळावरील अधिकारीच सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT