mumbai news  sakal
मुंबई

Mumbai News : निकृष्‍ट कामामुळे रस्‍ता गेला वाहून

कोट्यवधी रुपये खड्ड्यांत; प्रवासी, वाहनचालकांमध्ये संताप

सकाळ वृत्तसेवा

नेरळ - कर्जत तालुक्यातील कळंब - नेरळ - माथेरान मार्गाचे काम यंदाच्या जूनमध्ये करण्यात आले, मात्र पहिल्याच पावसात डांबर वाहून गेल्‍याने रस्‍त्‍याची दुर्दशा झाली आहे. रस्‍त्‍याच्या दुरुस्‍तीसाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी वाया गेल्‍याने नागरिक संताप व्यक्‍त होत आहे.

कळंब-नेरळ सुमारे १२ किलोमीटरचा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या रस्त्यामुळे पोशीर, वारे परिसरातील अनेक गावे-वाड्यावस्त्या नेरळ शहराला जोडल्‍या गेल्‍या आहेत. ग्रामीण भागातील कामगार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांची दररोज वर्दळ असते. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू होते. एक भागात रस्ता चांगला झाला की दुसरीकडे खड्डे पडतात.

पावसाळ्यापूर्वी मंजूर असलेले पोशीर ते पोहीदरम्यान सुमारे २ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम घाईघाईत करण्यात आले. जून अखेरीस काम पूर्ण झाले.

मात्र निकृष्‍ट दर्जामुळे पहिल्‍याच पावसात डांबर वाहून गेले. पोशीर ते पोही दरम्यान खड्ड्यांतून मार्ग काढताना दुचाकीस्‍वारांना कसरत करावी लागते. काही दिवसांपूर्वी कळंब येथील विद्यार्थ्यांचा खड्ड्यात पडून अपघात झाला होता. त्‍यानंतर रिक्षाचालकांनी पुढाकार घेत खड्ड्यात दगड, मातीचा भराव केला आहे.

नेरळ कळंब रस्त्यावरील कामाची पाहणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचित करण्यात आले आहे. खराब रस्‍त्‍याची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशा सूचना करण्यात आली आहे.

- संजीव वानखेडे, उपअभियंता, बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT