badlapur  sakal
मुंबई

Mumbai News : बदलापूर पाईपलाईन रोड अंधारात; एमआयडीसी प्रशासनाचे लक्षच नाही

अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोड रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरणचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. तसेच पावसाळ्यात खड्डे पडून या रस्त्याची चाळण झाली आहे. यात भरीस भर म्हणून येथील पथदिवे ही बंद असल्याने हा महामार्ग अंधारात गेल्याचे चित्र आहे. हा अंधार अपघातांना निमंत्रण देत

असून वाहनचालक डोळ्यात तेल घालून रात्रीचा प्रवास करत आहेत. गेले कित्येक महिने येथील पथदिवे हे बंद अवस्थेत असून एमआयडीसी प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे. कल्याण शीळ रोड मार्गे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरला जायचे असल्यास वाहने या मार्गाचा वापर करतात.

अंबरनाथ एमआयडीसी मधील जर अवजड वाहने तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक देखील याच मार्गाचा वापर करतात. या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यांची दुरावस्था आहे. तर काही ठिकाणी खड्डे पडून रस्ते खराब झालेले आहेत. यामुळे वाहनांना वाहन चालविताना कसरत करावी लागते.

त्यात रात्रीच्या वेळी येथील पथदिवे देखील बंद असल्याने अंधारात खड्डेतून प्रवास करताना चालक हैराण झाले आहेत. अंधारात खड्डे समजत नसल्याने वाहने आदळून वाहनांचे नुकसान होते शिवाय चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. बंद पथदिवे आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून अनेकदा वाहन कोंडी होते

या सर्व समस्या लक्षात घेता किमान या मार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. बदलापूर पाईपलाईन रोड हा एमआयडीसी कडे असल्याने एमआयडीसी प्रशासनाने येथे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT