मुंबई

शाळेचे मैदान की वाहनतळ? 

सकाळवृत्तसेवा

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेच्या शिरवणे येथील अरुण सुतार शाळा क्रमांक १५ च्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना हक्काच्या मैदानावर खेळता येत नाही. वाहनांमधून वाट काढत शाळेत ये-जा करावी लागत आहे. या प्रकारावरून महापौर जयवंत सुतार यांनी पालिका अधिकाऱ्यांना खडसावले. नागरिकांच्या वाहनांना पार्किंगची सुविधा द्यावी आणि शाळेच्या मैदानावरील पार्किंग हटवावे, असा आदेश त्यांनी दिला. 

नवी मुंबई पालिकेचे शिरवणे येथे अरुण सुतार विद्यालय आहे. तेथे प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग आहेत. या शाळेसमोर मोठे मैदान असून, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कवायत, मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी ते वापरले जाते. शिरवणे परिसरात हजारो नागरिक वास्तव्य करतात. या नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी सिडकोने आरक्षित जागा ठेवलेली नाही आणि पालिकेनेही पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. अनेक वर्षांपासून या मैदानाचा उपयोग वाहने पार्किंगसाठी केला जात असल्याने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मैदानाचा वापर करता येत नाही. महापौर जयवंत सुतार यांनी सोमवारी (ता. १३) शाळेला भेट दिली. त्या वेळी या मैदानावर पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या पाहून ते संतापले. या ठिकाणी सुरक्षारक्षक किती आहेत? याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना दोन शिफ्टमध्ये दोन सुरक्षारक्षक असल्याचे समजले. दोन सुरक्षारक्षक असूनही शाळेच्या मैदानावर पार्किंग केली जाते, यावर सुतार यांनी नाराजी व्यक्त करत पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिरवणेतील पार्किंगचा विषय गंभीर असून, दोन दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आणि शाळेच्या मैदानावर पार्किंगला बंदी घालण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. 

करायचे तरी काय?
शिरवणे गावात ये-जा करण्यासाठी मोठा रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना शाळेच्या मैदानातूनच ये-जा करावी लागते. ही शाळा शिरवणे गाव परिसरात आहे. गावामधील अरुंद रस्त्यावरून वाहने आत नेता येत नसल्याने शाळेच्या मैदानात ती उभी केली जातात. या गावात स्थानिकांबरोबरच इतर नागरिकही राहतात. यात रिक्षाचालक, खासगी वाहनचालक, स्कूल बसचालक आदींचा समावेश आहे. वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने ते शाळेच्या मैदानावर वाहने उभी करतात. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. आता महापौरांनी येथे पार्किंगला मनाई केली असल्याने काय करायचे, असा प्रश्‍न वाहनमालक व चालकांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Latest Marathi News Updates Live : साडेतीनशे एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

SCROLL FOR NEXT