Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत यांची जामीनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: भीमा कोरेगाव हिंसाचार, तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सुधा भारद्वाज व इतर काही जणांना न्यायालयाने नियमित जामीन दिला असून न्यायालयाने आपलाही नियमित जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद या दोघांच्या वतीने करण्यात आला. तपास यंत्रणेच्या वतीने मात्र त्यांच्या अर्जाला विरोध करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवला.

भीमा कोरेगाव हिंसाचार, तसेच एल्गार परिषद प्रकरणी २०१८ साली सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधा भारद्वाज आणि अन्य आठ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. सुधा भारद्वाज यांना सीआरपीसी कायद्याअंतर्गत न्यायालयाकडून डिफॉल्ट जामीन मिळाला असून डिफॉल्ट जामिनासाठी आपणही पात्र आहोत, अशी मागणी करत गडलिंग व राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज (ता. ३) न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्ते सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी युक्तिवाद केला; तर ॲड यशोदीप देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले.

‘एनआयए’च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी युक्तिवाद केला. त्यांनी याचिकाकर्त्यांच्या नियमित जामीन अर्जाला विरोध करत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT