मुंबई

Mumbai News: पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवस ब्लॉक! प्रवाशांसाठी बेस्टच्या अतिरिक्त बसगाडया धावणार

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकरिता ब्लॉक काळात बेस्टच्या बस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खार व गोरेगाव रेल्वेस्थानकांदरम्यान २६ आणि २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ५ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असून त्याबाबत पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने परिपत्रक जाहीर केले आहे. ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातील जवळपास तीनशेहून अधिक फेऱ्या दररोज रद्द होणार आहेत. काही गाड्या उशिरा धावणार आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता बेस्ट उपक्रमाने पश्चिम रेल्वेला समांतर असलेल्या एस. व्ही. रोड, लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर धावणाऱ्या २०२ मर्यादित, २०३, ४ मर्यादित, ८४ मर्यादित, ३३, २२५, ४४० मर्यादित, ४० मर्यादित इत्यादी बसमार्गांवर अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्लॉक कालावधीत आगार अधिकाऱ्यांना बोरिवली ते चर्चगेटदरम्यान रेल्वे आणि बस स्थानकांतील मुख्यतः गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान प्रवाशांच्या गर्दीचे अवलोकन करून त्वरित बसचे नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT