bmc sakal media
मुंबई

मुंबई महापालिकेचे अन्नदान संशयांच्या भाेवऱ्यात; कॉंग्रेसचा आरोप

समीर सुर्वे

मुंबई : कोविड लॉकडाऊन काळात (corona lock down) महानगरपालिकेने (BMC) स्थालांतरीत मजदूर (Shifted workers) तसेच गरजूंना दिलेल्या जेवणाच्या खर्चावर 130 कोटी रुपयांचा खर्च (Food Expenses) केला आहे. मात्र, हा खर्च संशयांच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. हा खर्च वाढवून दाखविण्यात आला असून त्यातील काही बिलेही (Expenses bill) उपलब्ध नसल्याचा गौप्यस्फोट कॉंग्रेसने (congress) केला आहे.

कोविड लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार बंद असल्याने स्थालांतरीत कामगारांसह हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटूंबाच्या जेवणाचा गंभिर प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावर राज्य सरकारने अशा व्यक्तींसह कुटूंबाना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे निर्देश महानगर पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने लाखो नागरीकांना रोज दोन वेळचे जेवण महानगर पालिका पुरवत होती.यासाठी 130 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र,हा खर्च वाढवून दाखविण्यात आला आहे असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.अनेक कंत्राटाची तर बिलेच नाही.प्रत्यक्ष कमी व्यक्तींसाठी जेवण वितरीत केलेले असताना व्यक्तीची संख्या वाढवून दाखविण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारकडून 12 कोटी

हा जेवणाचा खर्च राज्य सरकारकडून दिला जाणार होता.पालिकेने 130 कोटी रुपयांचा हिशोब दाखवला आहे. मात्र,राज्य सरकारकडून आता पर्यंत 12 कोटी रुपयेच मिळाले आहे. अशी माहितीही रवी राजा यांनी दिली.जेवणावळीसाठी खालेल्या खर्चाची सर्व माहिती येत्या काही दिवसात उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमुद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT