mumbai  sakal
मुंबई

Mumbai News : कॅब चालकाने केला तरुणीचा विनयभंग; कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

पीडित तरुणी ही कल्याण पूर्वेत राहण्यास असून नवी मुंबई येथे कामास आहे.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कॅबने प्रवास करत असताना कॅब चालकाने प्रवासी तरुणीचा विनयभंग केल्याची घटना

कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. पीडित तरुणी नवी मुंबई येथून कामावरून घरी कल्याणच्या दिशेने येत असताना शनिवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॅब चालक राकेश मिश्रा याचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणी ही कल्याण पूर्वेत राहण्यास असून नवी मुंबई येथे कामास आहे. शनिवारी रात्री कामावरून घरी येण्यासाठी तरुणीने कॅब बुक केली. प्रवासादरम्यान कॅब चालकाने तरुणीचा विनयभंग केला. कॅब चालकाच्या कृत्यानंतर पीडित तरुणीने आरडा ओरडा केला. तरुणीने आरडाओरडा सुरू केल्याने घाबरलेल्या कॅब चालकाने तेथून पळ काढला.

याप्रकरणी पीडित तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात कॅब चालका विरोधात तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार कॅब चालक राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार कॅब चालक राकेश मिश्राचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT