train 
मुंबई

Mumbai News : बालासोर रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेला जाग; 5 लेव्हल क्रॉसिंग गेट बंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बालासोर रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. रेल्वे सुरक्षा संदर्भात अनेक महत्वपूर्ण कामे हात घेतली आहे. रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद करण्यासोबतच रोड ओव्हर ब्रिज किंवा रोड अंडर ब्रिज बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट्स हळूहळू बंद केले जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा व्यक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि रेल्वे सुरक्षितता वाढत आहेत.

गेल्या महिन्यात मध्य रेल्वेतील ५ लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहे.यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने जुने आणि अतिशय कालबाह्य ओव्हरहेड वायर मध्य रेल्वेकडून काढण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मे-२०२३ मध्ये मध्य रेल्वेतील ५ लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मुंबई विभागातील २,नागपूर विभागातील २ आणि चाळीसगाव-धुळे दरम्यानचे एक लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहे. याशिवाय मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील पंढरपूर- सांगोला विभागात ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर्स (बीपीएसी) सिस्टीम देण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

बीपीएसी यंत्रणामुळे स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जाण्यासाठी एका ट्रेनच्या क्लीयरन्सनंतर ट्रॅक विभाग रिकामा आहे, त्या विभागात दुसर्‍या ट्रेनला परवानगी देण्यापूर्वी ड्रायव्हर आणि गार्डचा शेवट या दोन्ही ठिकाणच्या एक्सलची संख्या डिव्हाइसमधील सेन्सर्स तपासतात. जर संख्या जुळत नसेल तर ते त्रुटी किंवा अनियमितता दर्शवते. त्यामुळे मानवी चुका दूर होतात आणि स्थानकांदरम्यान गाड्यांची सुरक्षित हालचाल नियंत्रित होते.

कालबाह्य ओएचई काढले

मध्य रेल्वेने ओव्हर हेड वायर (ओएचई ) मास्ट जे अनावश्यक आहेत ते सुरक्षिततेला धोका आहे. त्यांना निवडून काढून टाकणे आवश्यक आहे. ट्रेन्सचे सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी ओएचई मास्ट्सचे क्रिटिकल इम्प्लांटेशन नियमितपणे केले जाते. मे-२०२३ मध्ये १२ क्रिटिकल इम्प्लांटेशन (ओएचई मास्ट्स) काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ४ आणि सोलापूर विभागातील ३ ओएचई मास्टर समावेश आहे.

आंतर-रेल्वे सुरक्षा ऑडिट

आंतर-रेल्वे सुरक्षा ऑडिट सर्व विभागामध्ये नियमितपणे केले जाते. उत्तम संरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी किंवा पूर्वाग्रह दूर करण्यासाठी निष्पक्ष तृतीय पक्ष ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. यामध्ये रेल्वे बोर्डाने नामनिर्देशित केलेल्या झोनच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांची एक टीम असते जी बोर्डाच्या सूचनेनुसार इतर झोनला भेट देतील आणि तृतीय पक्ष सेफ्टी ऑडिट करतील.

४ मे २०२३ आणि ५ मे २०२३ रोजी मुंबई विभागातील कल्याण-इगतपुरी विभागात उत्तर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाद्वारे मध्य रेल्वेवरील आंतर-रेल्वे सुरक्षा लेखापरीक्षण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT