masala shop mumbai  sakal
मुंबई

Mumbai News: मसाल्यांचा झणझणीतपणा स्वस्तावला; किलोमागे ५० रुपयांची घट

मसाल्याच्या मिरचीचा दरात घसरण; गृहिणींना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उन्हाळा सुरू झाला की अनेक महिला लाल मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यावर्षी अगदी दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता.

सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांचे दर घाऊक बाजारातच ४०० ते ५०० रुपये किलो झाले होती, मात्र आता हे दर किलोमागे ५० रुपयांनी कमी झाले असून मिरचीच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सध्या लाल मिरचीची उलाढाल वाढण्यास सुरुवात झाली आहे.
वाशीतील घाऊक मसाला बाजारात सध्या लाल मसाल्याच्या मिरच्यांची आवक वाढू लागली आहे.

सध्या मिरचीच्या १४ ते १५ गाड्या दररोज घाऊक बाजारात येत आहेत. हळूहळू या गाड्यांची संख्या वाढू लागेल. मुख्य हंगामात ८० ते ९० गाड्या मिरच्याच्या येतात. एका गाडीत चार ते पाच हजार गोणी मिरच्या असतात.

मिरच्यांच्या गोणीचे वजन ३० ते ३५ किलो असते. फेब्रुवारी ते मार्च हा बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना असतो. त्यामुळे या काळात मसाला बाजारात सर्वत्र लाल मिरच्यांचा ठसका लागतो. बाजारात बाहेरून फिरतानाही लाल मिरच्यांचा वास येत असतो.

एप्रिलमध्ये बहुतेक शाळांच्या परीक्षाही संपलेल्या असतात. त्यानंतर बहुतेक जण फिरण्यासाठी बाहेर जात असल्याने अनेकांचा कल त्याआधीच लाल मसाला तयार करून घेण्याकडे असतो. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मसाल्याच्या लाल मिरचीला जास्त मागणी असते.

त्यानुसार आता बाजारात लाल मिरचीला मागणी वाढू लागली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला होता.

त्यातच अनेक ठिकाणी गोदामात असलेली लाल मिरचीही पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून बाजारात लाल मिरचीचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती.

हे दर ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र या महिन्यापासून हे दर कमी होण्यास सुरुवात झाली असून घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची घट झाली आहे. घाऊकमध्ये दर उतरल्याने किरकोळ बाजारात ही दर ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपर्यंत मिरचीच्या दरात वाढ झाली होती. मात्र आता घसरण सुरू आहे. आता मसाले बनवण्यासाठी लगबगही सुरू झाली असल्याने, मिरचीच्या मागणीत घाऊक बाजारात वाढ झाली आहे. आताच्या मिरचीच्या पिकाचा विचार करता पुढे मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे.


अमरीश बारोट, मिरचीचे घाऊक व्यापारी

मिरचीचे आताचे दर
गुजरात बेडगी २२५ते २२७
कर्नाटक बेडगी ३०० ते ४२५
काश्मिरी ५०० ते ६००
तेजा २५० ते २७०
गुंटूर २४० ते २८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT