Mumbai News:  sakal
मुंबई

Mumbai News: बनावट नोटांचा घरातच छापखाना, पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातून घरातच बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल पाटील (२६) असे आरोपीचे नाव असून दोन लाख तीन हजारांच्या नोटांसह लागणारे साहित्य जप्त केले आहे.

तळोजा एमआयडीसीतील तोंडरे गावात राहणारा प्रफुल्ल पाटील संगणक व प्रिंटरद्वारे तयार केलेल्या बनावट नोटा एजंटमार्फत बाजारात चलनात आणत होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती.

त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता.१५) दुपारी छापा मारला होता. यावेळी पोलिसांना दोन लाख तीन हजार २०० रुपयांच्या ५०, १०० आणि २०० रुपयांच्या छापलेल्या नोटा सापडल्या. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अशाच पद्धतीने नोटा तयार केल्या आहेत. त्यामुळे किती नोटा चलनात आल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.

आरोपी नववी नापास

प्रफुल्ल पाटील हा नववी नापास आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये संगणक प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छापणाऱ्यांची माहिती युटयुबवर त्याला मिळाली होती. या माहितीवरून त्याने तळोजा येथील घरामध्ये बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले आहे.

५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटा

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५०, १०० आणि २०० रुपयांच्या दोन लाख ३ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यासोबतच छपाईसाठी वापरलेले प्रिंटर्स, स्कॅनर्स, कलर्स, संगणक असा तीन लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT