मुंबई

डुप्लिकेट पोलिस बनून फाईव्ह स्टार हॉटेलवर टाकली धाड; 12 कोटी केले लंपास

अनिश पाटील

मुंबई, ता. 20 : विलेपार्ले येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये तोतया पोलिसांनी छापा टाकून 12 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी भादंवि कलम 392, 170 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून  सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला ही घटना घडली असून हॉटेलमध्ये दाखल झालेल्या आरोपींनी पोलिस असल्याचे सांगून 12 कोटी रुपयांची रोख चोरली. हॉटेलमधील एका रुममध्ये दोन ग्राहक वास्तव्याला होते. पोलिस असल्याचे सांगून आरोपींनी या खोलीत छापा टाकला व त्यांच्याकडील 12 कोटींची चोरी केली.

याप्रकरणी दाखल झालेल्या जबाबात तक्रारदार आरोपींना ओळखत नसल्याचे सांगितले आहे. तसेच ते किती संख्येने होते, यााबाबतही अद्याप साशंकता आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमांतून पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत आठ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

mumbai news crime story fake police raids five star hotel and duped 12 crore

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT