Mumbai News 
मुंबई

Mumbai News : पांडुरंगाच्या दर्शनासाठी डबेवाल्यांनी घेतली एक दिवसाची सुट्टी; शुक्रवारी सेवा बंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील नोकरदार वर्गाला नियमित डबा पोहचवणारे डबेवाल्यांनी ३० जून रोजी एक दिवसाची सुट्टी घेतली आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध लागले असून, पंढरीला निघाले आहे. संतांच्या पालख्यां पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.

वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडूरंगाचे दर्शन घेण्याची आस डबेवाल्यांनाही लागली आहे. डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही म्हणुन मुंबई डबेवाला असोशिएशनया संस्थेला मानणारे डबेवाले कामगारांनी वारीला जाण्यासाठी एक दिवसाची रजा जाहीर केली आहे.

त्यामुळे शुक्रवार (ता. ३० ) रोजी डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी २८ जुन रोजी दिवसभर ते डबेवाले काम करतील व रात्री आपल्या वाहनाने पंढरपुरला रवाना होणार आहे. गुरुवार २९ जून रोजी एकादशीला शासकीय सुट्टी आहे. त्यादिवशी डबेवाले पांडूरंगाचे दर्शन घेतील आणि शुक्रवार ३० जून रोजी रोजी द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडतील व ते मुंबईला रवाना होतील.

१ जुलै शनिवारी डबेवाले नेहमी प्रमाणे कामावर हजर होतील. यादरम्यान डबेवाल्यांची शेकडो वर्षाची वारीची परंपरा आहे दर वर्षी तो सुट्टी घेऊन पंढरपुरला पांडूरंगाच्या दर्शनाला जातो यामुळे काही ग्राहकांची गैरसोय होईल त्याबद्दल डबेवाला संघटनेने दिलगीरी सुद्धा व्यक्त केली आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू केली आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT