MHADA  sakal
मुंबई

Mumbai News : 'म्हाडा'मध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याकरिता नागरिकांच्या सोयीकरिता मुदतवाढ देण्यात आली.

इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई मंडळातर्फे सुधारित वेळापत्रकानुसार, इच्छुक अर्जदार १० जुलै रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील तर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील.

तसेच, १२ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस आणि आरटीएफद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत.

२४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT