मुंबई

लाच घेताना उपनिबंधक आणि सहकार अधिकाऱ्याला रंगेहाथ धरलं, मुंबईत ACB ची कारवाई

अनिश पाटील

मुंबई, ता.12 : सोसायटीवर प्रशासक नेमण्यासाठी तसेच तक्रार अर्जावर कारवाई करण्यास मदत करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपाखाली सहकार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदाराने सोसायटीतील समितीविरोधात तक्रार केली होती.

याप्रकरणी उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले होते. पण त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे अटक करण्यात आलेली नसून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तक्रारदार हे खार येथील रहिवासी असून त्यांनी सोसायटीतील समितीच्या गैरव्यवाराबद्दल वांद्रे येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार केली होती. त्यात समितीने जनरल मिटीग, ऑडीट आदी गोष्टींच्या नोंदी ठेवल्या नसल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सहकार अधिकारी गणेश राठोड याने तक्रारीत मदत करण्यासाठी तसेच सोसायटीवर प्रशासन नेमण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली.

पुढील पडताळणीत उपनिबंधक गौतम वर्धन हेही त्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पण पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली.

त्यानुसार सापळा रचून एक लाखांची लाच घेताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. पण उपनिबंधकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपाचारानंतर त्यांच्यावर पुढी कारवाई करण्यात येईल, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. 

Deputy Registrar and other government officer caught red handed while taking bribe by ACB

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT