मुंबई

डॉग पार्क रखडणार?

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - २१ व्या शतकातील स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला डॉग पार्ककरिता खेळणी पुरवठादार मिळत नसल्याने हा प्रकल्प अडचणीत आला आहे. वाशीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी प्रशासनाकडे डॉग पार्कची मागणी केली होती. यावर पशुवैद्यकीय विभागाने माहितीस्तव आराखडा सादर केला आहे. मात्र डॉग पार्कमध्ये आवश्‍यक खेळणी मागवण्यासाठी पुरवठादार मिळत नसल्याने पुढील कार्यवाही थांबली आहे. 

महापालिकेच्या हद्दीत २००७ ला झालेल्या १८ व्या पशुगणनेनुसार तीन हजार ११० घरगुती श्‍वानांची नोंदणी झालेली आहे; मात्र तरीही श्‍वानांना शहरात फिरायला घेऊन जाण्यासाठी अधिकृत ठिकाण नाही. सर्वात जास्त उद्याने असलेले शहर म्हणूनही नवी मुंबई महापालिका ओळखली जाते; परंतु महापालिकेच्या उद्यानांमध्येही श्‍वानांना फिरण्यासाठी वेगळी जागा नाही. अधिकृत जागेअभावी श्‍वानप्रेमींना लाडक्‍या श्‍वानांना रस्त्यावर अथवा एका आडोशाच्या जागेवर घेऊन फिरावे लागते. तसेच सकाळी नैसर्गिक विधींसाठी अडगळीतील जागांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे महापालिकेने शहरात एखाद्या ठिकाणी डॉग पार्क तयार करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने वाशी सेक्‍टर ८ मधील वीर सावरकर उद्यानातील जागा निवडली होती. या उद्यानात एक छोटेखानी प्रायोगिक तत्त्वावर डॉग पार्क उभारण्यात येणार होते. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने ढोबळ आराखडाही अभियांत्रिकी विभागाला पाठवला होता. यात १६ प्रकारची खेळणी घेण्यायोग्य असल्याचे सुचवण्यात आले होते. यात डॉगवेस्ट स्टेशन, डॉग वॉक, उड्या मारण्यासाठी जम्प हर्डल, ब्रीज क्‍लाईंब, डॉग क्रॉल, लाकडाचे ठोकळे असणारे स्टेपिंग फॉग, पाण्यात खेळण्यासाठी टब अशा प्रकारची खेळणी खरेदी करण्यात येणार होती. मात्र महापालिकेला अशी खेळणी पुरवणारा कंत्राटदारच मिळत नाही. 

शहरात डॉग पार्क तयार करून श्‍वानप्रेमींना सवलत देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे. डॉग पार्कसाठी आवश्‍यक खेळणी बसवण्यासाठी दरपत्रक मागवण्यात आले आहे; परंतु डॉगपार्कची खेळणी दुर्मिळ असल्याने आत्तापर्यंत दरपत्रक देणारा पुरवठादार मिळालेला नाही. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT