Mumbai News 
मुंबई

Mumbai News : आली लहर केला कहर! पठ्ठ्याने ट्रक थेट समुद्रातच घुसवला

Sandip Kapde

मुंबई : आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर ,आमचा जीव आहे गाडीवर हे गाणे मध्यंतरी फारच गाजल. प्रत्येक ट्रक ड्रायव्हर आपल्या गाडीवर जीवापाड प्रेम करतो. या प्रेमापोटीच की काय लहर आलेल्या ट्रक चालकाने भलताच कहरच केल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईच्या वर्सोवा भागात एका ट्रक ड्रायव्हरला हुक्की आली आणि त्याने आपला ट्रक थेट समुद्रातच घुसवला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. मुख्य रस्ता सोडून ट्रक थेट गणपती विसर्जन करण्यासाठी बनवलेल्या रॅम्प वरून समुद्रात घुसवला.

यानंतर मात्र ड्रायव्हरला त्याची चूक लक्षात आली. त्याने ट्रक समुद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ट्रक अधिकच मातीत घुसू लागला आणि ट्रक चालकाने तिथून पळ काढला.

अचानक समुद्राला आलेल्या भरतीमुळे ट्रक समुद्राच्या लाटांवर तरंगू लागला आणि थेट किनाऱ्यावरील दगडांना जाऊन धडकू लागला यामुळे ट्रकचे बोनटचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शिवाय इंजिन देखील समुद्राचे पाणी गेल्यामुळे बिघडले आहे. अखेरीस दुपारी अडीच वाजता क्रेनच्या सहाय्याने ट्रक समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT