मुंबई

रात्री थंडी, दिवसा अंगाची लाही लाही; वाढलेल्या उष्णतेबाबत हवामान विभागाचा पुढील अंदाज काय ?

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 8 : मुंबईतील कमाल तापमानात फारसा बदल झाला नसला तरी आर्द्रतेच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यत असून उकाडा अधिक जाणवणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मुंबईत सध्या रात्री थंड तर दिवसा गरम वातावरण असल्याचे दिसते. रविवारच्या तुलनेत मुंबईतील तापमानात फारसा फरक जाणवला नाही. सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.6 अंश तर कुलाबा येथे कमाल तापमान 32.2 अंश सेल्सियस नोंदवले गेले. आद्रता मात्र कमी झाली असून सांताक्रूझ परिसरातील आद्रता 86 वरून 59 टक्क्यांवर तर कुलाबा परिसरातील आद्रता 93 वरून 68 टक्क्यांवर खाली आली आहे. 

विदर्भातील काही भागात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात विदर्भामधील काही परिसरातील काही भागात किमान तापमान वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे राज्यभरातील कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

mumbai news drop in humidity read what IMD saying about further weather prediction

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

SCROLL FOR NEXT