Mumbai News 
मुंबई

Mumbai News : लोकल ट्रेन रुळावरून घसरली! कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी सेवा विस्कळीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकांदरम्यान डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना समोर आली. लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८.२५ वाजता अंबरनाथ येथे रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरले. घटनेची माहिती संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर लोकलचे चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या घटनेमुळे कल्याण ते कर्जत दरम्यानच्या लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच डाऊन एलटीटी - विशाखापट्टणमला अंबरनाथ येथे थांबून ठेवले आहे. तसेच एक डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर येथे थांबविले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT