मुंबई

मुंबईतील रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; २२ मृत्युमुखी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर शुक्रवारी (ता. २९) गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जण मृत्युमुखी पडले. तसेच ३० जण जखमी झाले. 

चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात १८ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ३० जण जखमी झाले आहेत. आज (ता. २९) सकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्याच वेळी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावर प्रचंड गर्दी झाली. हा पूल कायम गर्दीने भरून वाहत असतो. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास ३० जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

यामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सुरवातीला आले होते. मात्र, हा आकडा वाढला असून तो पंधरावर पोचला आहे. दरम्यान, २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेच्या पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण बेशुद्ध पडले आहेत.

केईएम हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी पावणेबारा वाजता दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणण्यात आलेल्या 15 लोकांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झालेला होता.  

सकाळी ११ च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर ही घटना घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. याशिवाय डॉक्टरांचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. अतिशय अरुंद असलेला पूल, त्यातच आलेला पाऊस आणि पूल कोसळल्याची पसरवण्यात आलेली अफवा यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घडल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी घोषित केली असून, भविष्यात अशा घटना होणार नाहीत, त्यासाठी आवश्यक दक्षता घेतली जाईल, असे सांगितले. 

अत्यंत दुर्देवी घटना
जुन्या पुलांची दुरुस्ती आवश्यक आहे.  मुंबईत दहा ते बारा ठिकाणी तातडीने कामाची गरज आहे.  रेल्वे मंत्र्याशी याबाबत पुन्हा चर्चा करणार आहे.  
- खासदार किरीट सोमय्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT