Mumbai News 
मुंबई

Mumbai News : 'परे'च्या चार विशेष गाड्यांना मुदतवाढ! प्रवाशांना मोठा दिलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-अजमेर, वांद्रे टर्मिनस-बाडमेर, वलसाड-भिवानीआणि डोदरा-हरिद्वार दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०३९ वांद्रे टर्मिनस - अजमेर साप्ताहिक विशेष जी पूर्वी २८ जून २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती ती आता २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०४० अजमेर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी २९ जून पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ती आता २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०९००७ वलसाड – भिवानी साप्ताहिक विशेष जी पूर्वी २९ जून २०२३ पर्यंत ती आता २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९००८ भिवानी – वलसाड साप्ताहिक विशेष जी यापूर्वी ३० जून २०२३ पर्यंत ती आता २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९०३७ वांद्रे टर्मिनस - बाडमेर साप्ताहिक विशेष आता २९ सप्टेंबर२०२३ पर्यंत, ट्रेन क्रमांक ०९०३८ बारमेर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष आता ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तर ट्रेन क्रमांक ०९१२९ वडोदरा - हरिद्वार साप्ताहिक विशेष जी यापूर्वी २४ जून २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती ती आता ३० सप्टेंबर२०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT