Local sakal
मुंबई

Mumbai News : मालाड स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड! ९० लोकल रद्द, तर २२०...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील सिग्नल यंत्रणे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचे तीन-तेरा वाजले. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यत तब्बल ९० लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर आली आहे. या बिघाडामुळे तब्बल २२० लोकलला लेटमार्क लागला. त्यामुळे भर उन्हाळयात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिवसभर लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी (ता.१३) सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मालाड स्थानकातील सिग्नल यंत्रणेच्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणा पुर्णपणे ठप्प पडली होती.त्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.

परिणामी लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहितीने मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले. सुमारे ५०० मीटर अंतरावरील एकुण ८ केबल बदलल्या.

याकरिता रेल्वेचे ४० अधिकारी,कर्मचारी कार्यरत होते.अखेर दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास डाउन मार्गावरील वाहतुक सुरु करण्यात रेल्वेला यश आले. मात्र, प्रवाशांना बराच वेळ नेमका बिघाड काय झाला आहे, हे कळत नव्हते. त्यातच उद्घघोषणा होत नसल्याने प्रवासी त्रासले होते. लोकलमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांनी खाली उतरुन रुळामधून चालत जाऊन जवळचे बसस्थानक गाठत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

प्रवासी हैराण

पश्चिन रेल्वेने या सिग्नल बिघाडानंतर डाउन धिम्या मार्गावरील वाहतुक सुरु ठेवली होती. मात्र सिग्नल यंत्रणेच्या बिघाडामुळे अप-डाउन धिमी आणि जलद चारही मार्गावरील लोकलची वाहतुक विस्कळित झाली होती. हा गोधळ दिवसभर सुरु असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ९० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. तर २२० पेक्षा जास्त लोकल उशिराने धावत होत्या. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सर्व मार्गावरील लोकल वाहतुक पुर्वपदावर आली.

रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा

मालाड स्थानकातील सिग्नल बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. अनेक लोकल सेवा एका मागे एक उभ्या असल्याने लोकल गाड्याच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम पडला होता. लोकल सेवांचा नियमित वेळापत्रकापेक्षा सुमारे एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. परिणामी संद्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. दादर,अंधेरी, वांद्रे,गोरेगांव, मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT