satta mataka frud sakal
मुंबई

Mumbai News : पोलीसांकडून बनावट शेअर ट्रेडिंग कंपनीचे रॅकेट उघड; 3 महिन्यात कोटीची उलाढाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका 33 वर्षीय शेअर ब्रोकरला अटक केली आहे. धिमंत गांधी असे आरोपी शेअर ब्रोकरचे नाव आहे. अटक आरोपीने अवैधरित्या शेअर ब्रोकिंग करून सुमारे कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपीने 1.95 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कर आणि शुल्क न भरून सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.या व्यतिरिक्त पोलिसांनी अन्य 4 आरोपीना देखील अटक केली आहे.

आरोपी शेअर ब्रोकर धिमंत गांधी शेअर ट्रेडिंगचा कोणताही वैध परवाना नसताना 'मूडी' नावाच्या अॅप्लिकेशनच्या मदतीने अवैधरीत्या शेअर ब्रोकिंग करत होता. या शेअर ब्रोकरची मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांच्या पथकासह कांदिवली भागातील महावीर नगर येथील शेअर ब्रोकरच्या कार्यालयावर छापा टाकला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी कार्यालयातून 50000 रुपये रोख, पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक टॅब, एक पेपर श्रेडर आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह एक पेन ड्राइव्ह जप्त केला आहे.

यापूर्वीची कारवाई

यापूर्वी या प्रकरणाच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी बुधवारी 20 जून रोजी एका 45 वर्षीय शेअर ब्रोकरला अटक केली होती. जतिन सुरेशभाई मेहता असे आरोपी शेअर ब्रोकरचे नाव होते. या आरोपीने 3 महिन्यांत अवैधरित्या शेअर ब्रोकिंग करून सुमारे 4672 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपी जतीन सुरेशभाई मेहता 1.95 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कर आणि शुल्क न भरून सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT