Mumbai Crime 
मुंबई

Mumbai Crime : शेअर मार्केट दुसरा 'हर्षद मेहता' अटकेत; तीन महिन्यात 4 हजार कोटींची उलाढाल केल्याचे उघड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई पोलिसांनी बुधवारी एका 45 वर्षीय शेअर ब्रोकरला अटक केली आहे. जतिन सुरेशभाई मेहता असे आरोपी शेअर ब्रोकरचे नाव आहे. या आरोपीने 3 महिन्यांत अवैधरित्या शेअर ब्रोकिंग करून सुमारे 4672 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आरोपी जतीन सुरेशभाई मेहता 1.95 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कर आणि शुल्क न भरून सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

आरोपी मेहता स्टॉक एक्स्चेंजचा कोणताही वैध परवाना नसताना 'मूडी' नावाच्या अॅप्लिकेशनच्या मदतीने अवैधरीत्या शेअर ब्रोकिंग करत होता. या शेअर ब्रोकरची मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांच्या पथकासह कांदिवली भागातील महावीर नगर येथील शेअर ब्रोकरच्या कार्यालयावर छापा टाकला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी कार्यालयातून 50 हजार रुपये रोख, पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक टॅब, एक पेपर श्रेडर आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह एक पेन ड्राइव्ह जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे - शायना एनसी

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT