Fire esakal
मुंबई

Mumbai News : गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत होरपळून एकाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. जेवण बनवण्यासाठी गॅस स्टोव्ह सुरू केला असता एलपीजी गॅस सिलिंडरला गळती झाली. ज्यामुळे लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे.

हरीश चव्हाण या 55 वर्षीय व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. गोरेगाव पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच याप्रकरणी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर परिसरात हरीश चव्हाण आणि त्याचा एक साथीदार आज सोमवारी सकाळी कामावर निघण्यापूर्वी घरी जेवण बनवण्याची तयारी करत होते. यासाठी लाईटरने शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता आगीचा भडका उडाला. ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच हरीश चव्हाण यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला.

यात हरीश चव्हाण भाजून गंभीर जखमी झाले. त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने हरीश यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला मात्र भाजलेल्या जखमा जास्त असल्यामुळे हरीश यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT