animal orphanage  
मुंबई

मानलं 'या' तरुणाला! मावतेचा दृष्टिकोन ठेवत जखमी पशु-पक्षांसाठी उभारलं पशू अनाथालय

सकाळ वृत्तसेवा

पाली : भटक्‍या जखमी व वृद्ध पशु-पक्ष्यांना कोणीच वाली नसतो. अशा पशु-पक्ष्यांच्या जीवनाचे मोल राखत मानवतेच्या दृष्टिकोनातून एका तरुणाने पशू अनाथालय सुरू केले आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड-विठ्ठलवाडी याठिकाणी सात एकर जागेत ‘ॲनिमल मॅटर टू मी’ या संस्थेच्या माध्यमातून गणेश नायक हा तरुण अनाथ व जखमी पाळीव प्राण्यांची सेवा करीत आहे, त्‍यांच्यासाठी तो देवदूत ठरला आहे.

रस्त्यावर जखमी अवस्थेतील गुरे, श्वान, मांजर व अन्य प्राण्यांकडे दुर्लक्ष होत असल्‍याने अनेकदा त्‍यांचा मृत्‍यू होतो. अशा प्राण्यांच्या जीवनात जगण्याची उमेद जागवण्यासाठी गणेशने अनाथालय सुरू केले आहे. या माध्यमातून अनाथ व जखमी प्राण्यांना हक्काचे आश्रयस्थान मिळाले आहे.

जखमी पशु-पक्ष्यांवर अनाथलयात उपचार केले जातात, ते बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले जाते. तर वृद्ध प्राण्यांचे पालन पोषण याच ठिकाणी केले जाते. याशिवाय गुरे, कोंबड्या, बकऱ्या, कुत्रे, मांजर आदींसह गुरांसाठी हे पशू अनाथालय वरदान ठरत आहे.

"अनाथ पशु-पक्ष्यांची अनेकदा अवहेलना केली जाते. त्‍यांना हक्‍काचा निवारा देण्याचा प्रयत्‍न आहे. अनेकदा लोक भटके पशू रस्‍त्‍यात जखमी झाल्‍याचे सांगतात. अशा जखमी प्राण्यांची शुश्रूषा केली जाते. उपचारानंतर पुन्हा अधिवासात सोडले जाते. तर वृद्ध जनावरांचे संगोपन केले जाते."

- गणेश नायक, पशू अनाथलयाचा संस्‍थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT