मुंबई

औरंगाबाद पालिका गिरवणार  कचरा व्यवस्थापनाचे धडे

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - महापालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमीवरील घनकचरा व्यवस्थापनाचे विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी कौतुक केल्यानंतर गुरुवारी (ता. १४) औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडले यांनी या प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्यासोबत उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, विरोधी पक्षनेते फिरोज खान, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी होते. 

औरंगाबाद महापालिकेत कचरा वर्गीकरणासह विल्हेवाट लावण्याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी तुर्भे क्षेपणभूमीची पाहणी केली होती. शास्त्रोक्त पद्धतीने केले जाणारे कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया पसंत पडल्याने त्यांनी औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना नवी मुंबईचा धडा गिरवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महापालिकेचे शहर अभियंते मोहन डगांवकर यांनी औरंगाबादला जाऊन महापौर, आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसमोर कचरा व्यवस्थापनाचे सादरीकरण केले होते. त्यामुळे प्रभावित झालेल्या महापौरांनी शिष्टमंडळासह तुर्भे येथील क्षेपणभूमीची पाहणी केली. तेव्हा डगांवकर यांनी त्यांना क्षेपणभूमीची माहिती दिली. क्षेपणभूमीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याच्या वर्गीकरणाबरोबरच सेंद्रिय खताची माहिती जाणून घेतली. या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालय, थिम पार्क, उद्याने, विरंगुळा केंद्रांनाही भेटी दिल्या. येथील पायाभूत सुविधा आणि विकासाने आपण प्रभावित झाल्याचे घोडले यांनी सांगितले. महापालिका मुख्यालयाची भव्य इमारत, इमारतीची मांडणी व स्थापत्यकलेने ते भारावले. महापालिकेने कोपरखैरणे येथे क्षेपणभूमीच्या जागेवर सेंद्रिय पद्धतीने फुलवलेले निसर्गोद्यान पाहून प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन स्वागत केले. महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी महापालिका मुख्यालयात त्यांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT