garlic Mumbai News  sakal
मुंबई

Mumbai News: लसणाची फोडणी महागली; किरकोळ बाजारात 500रु किलो भाव

लसणाच्या दरवाढीमुळे ग्राहकांची चिंता; बाजारातील आवक कमी होऊन भाव वधारले

सकाळ वृत्तसेवा

शाकाहारी असो वा मांसाहारी, लसणाच्या फोडणीशिवाय जेवणाला चवच येत नाही. वर्षभरापासून बाजारात लसणाची आवक घटल्याने ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची फोडणी बसत आहे.

मागच्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे लसणाचे दर पडलेले होते. पुरवठा जास्त आणि मागणी स्थिर असल्यामुळे कमी भाव मिळत होता. त्यामुळे गेल्या वर्षी लसणाच्या लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

त्यामुळे गेल्या वर्षांपासून बाजारात लसूणाची आवक घटल्यामुळे दर आकाशाला भिडले आहेत. सध्या घाऊक बाजारात लसणाच्या दहा गाड्या येत आहेत. लहान गाड्यांमधून ही वाहतूक होत असून आवक निम्म्यावर आली आहे. सर्वसाधारण लसणाचे दर घाऊक बाजारात ५० ते १२० रुपये किलोपर्यंत असतात.

हेच दर आता २०० ते ३७० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आवक वाढली तरच हे दर कमी होणार असल्यामुळे नव्‍या हंगामातील लसणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नव्‍या हंगामातील लसूण दरवर्षी मार्चनंतरच बाजारात येतो, त्यामुळे मार्चनंतरच लसणाचे दर कमी होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

सध्या ओल्या लसणाचीच आवक सुरू

सध्या लसणाचे दर वाढले असल्याने काही व्यापारी आपल्या शेतातील ओला लसूण बाजारात पाठवत आहेत. हा लसूण २०० ते २५० रुपये किलोने घाऊक बाजारात विकला जात आहे. मात्र, हा ओला असल्याने दोन-तीन दिवसांतच तो काळा पडत आहे. त्याला बुरशी लागत आहे.

घाऊक बाजारातील लसणाचा दर

देशी ओला लसूण - २०० ते २५० रुपये किलो

उटी सुका लसूण - ३०० ते ३७० रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT