मुंबई

Mumbai News: घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रकार दुर्दैवी

अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली असल्याचा आरोप देखील सामंत यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र, घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

तसेच उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली असल्याचा आरोप देखील सामंत यांनी केला. अभिषेक घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरान्हो यांनी चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करून त्याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे. अभिषेक घोसाळकर याची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो यानेही वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता.

या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी मॉरिस नोरान्हो हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशीच संबंध होता, हे सविस्तरपणे सांगितले. त्यासाठी उदय सामंत यांनी 'सामना' दैनिकातील कात्रणे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातूनच घडल्याचे ठळकपणे अधोरेखित केले. उदय सामंत पुढे म्हणाले की, अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो चे उदात्तीकरण उबाठा पक्षाचे मुखपत्र 'सामना' मधून करण्यात आले आहे. 'सामना'तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता.

मॉरिसच्या कामाला 'सामना'तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांना यांना जबाबदार धरणे चूक आहे. आरोप प्रत्यारोप होतात हे मी समजू शकतो, त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो. पण आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचे व त्यांना बदनाम करायचे ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे त्याला छेद देण्याची आज गरज आहे.

उदय सामंत पुढे म्हणाले की, मी कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कुणाला आदर्श मानतो आणि मी कुणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे अशी ट्विट्स देखील मॉरिसने ने सोशल मिडीयावर टाकलेली आहेत. म्हुणुन अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण,याचा शोध घेतला पाहिजे. तसेच फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उदय सामंत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर प्रकरणातील आरोपीचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू, अटकेच्या भीतीनं गेलेला पळून

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: आजही सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती भरते - सुजात आंबेडकर वंचित नेते

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT