मुंबई विद्यापीठ sakal
मुंबई

Mumbai News : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत. यासोबतच सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नितीन एम. जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने सुधारित कार्यक्रम तयार करण्यासाठी आणखी मुदत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

आमदार मनीषा कायंदे यांची तक्रार प्राप्त झाल्यामुळे मतदार यादी फेरतपासणीच्या संबंधातील अहवाल देण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा अवधी देण्याची मागणी विद्यापीठातर्फे न्यायालयात करण्यात आली; मात्र उच्च न्यायालयाने मागणी मान्य करण्यास नकार देत पुन्हा मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे खडे बोल सुनावले. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय २५ ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे. सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याच्या विद्यापीठाच्या परिपत्रकाला सागर नेवरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

तसेच, निवडणूक स्थगितीचा निर्णय हा राजकीय दबावाखाली घेण्यात आला असून तो बेकायदा, कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आणि विकृत असल्याचे जाहीर करण्याची आणि रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुनील भिरुड यांनी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Kolhapur Circuit Bench : 'मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली'; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान

Police Humanity: पुलाखाली हरवलेली ती.. अन् खाकीतील देवदूत; नावाच्या एका धाग्यावरून कऱ्हाड पोलिसांची कामगिरी; कुटुंबाकडे केले स्वाधीन..

Marathi News Live Updates : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुग्धशर्करा योग; त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

SCROLL FOR NEXT