मुंबई

मुंबई पोलिसांचे 'थोबाड काळे झाले' अशी भाषा देवेंद्र फडणवीस कसे वापरू शकतात?- अनिल देशमुख

सकाळ डिजिटल टीम

मुंबई , ता. 9:  स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलिस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. मुंबई पोलिसांचे 'थोबाड काळे झाले' अशाप्रकारची भाषा कसे वापरू  शकतात? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

महाराष्ट्र पोलिस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही असेही अनिल देशमुख म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत असा आरोपही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 

महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

mumbai news home minister anil deshmukh on the statement of devendra fadanavis on mumbai police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT