मुंबई

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आता द्यावी लागणार पूर्ण विषयाची परीक्षा; 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा  दिलासा नाही

संजीव भागवत

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल मे महिन्यात घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा कोणताही लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या पूर्ण अभ्यासक्रमावरच आधारित परीक्षा द्यावी लागणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने 24 जुलै रोजी दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता जे विद्यार्थी दहावी आणि बारावीला रिपीटर आहेत आणि जे श्रेणीसुधार या योजनेच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही पूर्ण विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. 

राज्यात मागील मार्च महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे शाळा, महाविद्यालय सुरू नव्हती. तसेच विविध प्रकारचे क्लासेससुद्धा बंद होती. त्यामुळे जे रिपीटर आणि श्रेणीसुधार विद्यार्थी होते, त्यांनाही पुन्हा नव्याने अभ्यास करता आला नाही. कोरोनाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी दडपणाखाली होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुद्धा 25 टक्के अभ्यासक्रम कपातीची सवलत देणे आवश्यक होते.

मात्र आता परीक्षा काही महिने शिल्लक असताना  शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून या विद्यार्थ्यांवर अन्याय केल्या असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.

mumbai news repeater and special category students will have to give full syllabus test

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT