Mumbai News 
मुंबई

Mumbai News : हायड्रोलिक कार पार्किंग कोसळली अन् सफाई कामगार त्याखाली आला...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : चेंबूर परिसरात एका इमारतीतील हायड्रोलिक कार पार्किंगच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक त्याखाली सापडून एका सफाई कर्मचाऱ्याचा सोमवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला .योगेश जाधव असे मृत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी नादुरुरस्ती करणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपुऱ्या जागेत जास्त वाहने उभी करता यावी यासाठी सध्या अनेक इमारतींमध्ये हाइड्रोलिक कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

चेंबूर परिसरातील स्वस्तिक फ्लेअर या इमारतीमध्ये हाइड्रोलिक कार पार्किंगचीसुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या इमारतीतील हाइड्रोलिक कार पार्किंगचा काही भाग सोमवारी नादुरुस्त झाल्याममुळे काही कर्मचारी त्याची दुरुस्ती करण्यासाठी आले होते.

कर्मचारी कामात व्यस्त असताना या इमारतीमध्ये साफसफाईचे काम करणारा योगेश जाधव उपस्थित होता. मात्र याच वेळी अचानक दोन मोटरगाड्यांसह हाइड्रोलिक वाहनतळ खाली कोसळले. त्याखाली सापडलेला योगेश जाधव गंभीर जखमी झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने जाधवला कोसळलेल्या वाहनतळाखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT