मुंबई

मुंबई विमानतळावर 'इसिस'चे धमकीचे पत्र

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्वच्छतागृहात इसिसकडून धमकीचे पत्र आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाकडून (इसिस) नववर्षात प्रजासत्ताकदिनी विमानतळावर हल्ला घडवून आणणार असल्याची धमकी पत्रात होती.

विमानतळाच्या इमारतीतील स्वच्छतागृहात बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास एका कर्मचाऱ्याला पत्र सापडले. त्याने ही माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. "सीआयएसएफ'चे जवान, पोलिस आणि बॉंबशोधक-नाशक पथकाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्गो टर्मिनल तत्काळ रिकामे केले आणि परिसरात शोधमोहीम राबविली. त्यात कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर प्रवाशांबरोबरच कामगारांची कडक तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना विमानतळावर सोडण्यात आले. या घटनेचा विमानाच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही; मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून तत्काळ कार्गो टर्मिनल रिकामे करण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT