मुंबई

काळा घोडा चौकाच्या नामकरणावरून खडाजंगी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्राईलचे पंतप्रधान दिवंगत शिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गुरुवारी पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला. या बैठकीत या प्रस्तावावरून समाजवादी पक्ष आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या चौकाच्या नामकरणाच्या फलकाचे गुरुवारी (ता. 18) अनावरण करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता.

काळा घोडा परिसरातील चौकाला पेरेस यांचे नाव द्यावे, असे पत्र फेडरेशन ऑफ इंडो इस्राईल चेंबर्स ऑफ कॉमर्सने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी या नामकरणाचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. मुंबईसह देशभरात इस्राईली नागरिक राहत असल्याने या चौकाला पेरेस यांचे नाव देण्यास हरकत नाही, असा दावा भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी या वेळी केला.

'भारताच्याच काय मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक; तसेच राजकीय क्षेत्रात पेरेस यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळे त्यांचे नाव चौकाला देणे योग्य नाही. हे नामकरण झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल,'' असा इशारा समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी दिला. त्यामुळे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडील गमावलेला मोशे होल्टझबर्ग हा मुलगाही त्यांच्या सोबत मुंबईत आला आहे. नेतान्याहू गुरुवारी मुंबईत आले. त्यांच्या उपस्थितीत या चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT