Mumbai  Sakal
मुंबई

Mumbai News : डोंबिवलीत अपहरण करून धावत्या रिक्षात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,झटापटीत पोलिस जखमी

पोलिसांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला,पोलिसांनी रिक्षाचालकासह दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या.आरोपी सराईत गुन्हेगार.

सकाळ वृत्तसेवा

कल्याण - महिला रिक्षा प्रवाशाचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून नग्न अवस्थेत तिला धावत्या रिक्षातून फेकून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत शुक्रवारी रात्री घडली. महिलेचे दैव बलवत्तर म्हणून त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान पाठलाग करत पोलिसांनी रिक्षाचालकासह दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे रिक्षातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रभाकर पाटील (वय 22), वैभव तरे (वय 19) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री 10.45 वाजता खिडकाळी बस स्टॉपवरून कोळेगाव येथे घरी जाण्यासाठी एका महिलेने आरोपी प्रभाकर पाटील याची  रिक्षा पकडली. यावेळी रिक्षामध्ये आरोपी वैभव तरे आधीच बसला होता.

मात्र कोळेगाव येथे रिक्षा न थांबवता या दोघांनी स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. माय सिटी या निर्जन स्थळी रिक्षा नेऊन त्या महिलेला विवस्त्र करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचवेळी गस्तीवर असलेल्या बीटमार्शल अतुल भाई आणि सुधीर हासे दोन पोलिसांना या रिक्षाचा संशय आल्याने मोटरसायकलने पाठलाग करत ते घटनास्थळ गाठले.

पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच या दोघा नराधमाांनी धावत्या रिक्षातून पिडीतेला ढकलून दिले. महिलेला दिलासा देत त्यांनी लागलीच त्या रिक्षाचा पाठलाग केला. आणि दोघा नराधमांना ताब्यात घेतले.

झटापटीत पोलिस जखमी

दोघा नराधमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत असताना पोलिसांसोबत त्यांनी झटापट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस शिपाई अतुल भाई यांच्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. मात्र जीवाची पर्वा न करता त्यांनी या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी तरे सराईत गुन्हेगार

अटक आरोपी प्रभाकर पाटील आणि वैभव तरे यांना अटक करून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान वैभव तरे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

SCROLL FOR NEXT